By Tejaswini(Tejoy)
हसण्याची कारणे कशाला
उगाच हसवावे कधी स्वतःला
हसता हसता डोळे भरून
न्याहाळावे आरश्यात मनाला
ओठांवर ओघळू दे
हृदयातील गीत
हसणाऱ्या त्या स्वप्नांना
दे पंख भरारीचे.......
तुझ्यातल्या मला
वाऱ्यासमीप वाहू दे
पडलेल्या चेहऱ्यावर
थोडेसे स्मित राहू दे
हसण्याला कारणे कशाला
उगाच हसावे पुन्हा
विसरून एकदा
वाटेवरच्या पाऊलखुणा
By Tejaswini(Tejoy)
コメント