By Archika Bapat
शांत किनारी कातरवेळी
काळोखात मी बसते जेव्हा
चांदण्याच जणू निखळून साऱ्या
पडतात माझ्या प्रांगणी तेव्हा
रातकिड्यांची किरकिर ऐकू येता
अंधारातही साथ लाभते
अंधाराच्या सौंदर्याचं,
तेव्हा जणू मज दर्शन घडते
रात्रीच्या वेळी बसून तेथे
शीतलता मी अनुभवते
शेकोटीच्या संगे हरपून जाते
गाण्यांच्या मैफिलीने
कितीही केले वर्णन तयाचे
त्याचे सौंदर्य संपत नाही
समुद्राची साद ऐकू येता
त्याच्या कुशीत शिरून जाते
सुखाचे चांदणे अनुभवत मी
त्याच्या संगे समरस होते
By Archika Bapat
Comments