By Archika Bapat
श्रावणात मोगरा, चाफा
फुलू लागला भल्या पहाटे
काळोखाला मागे टाकून
खुणावू लागला पानांमागून
उन पावसाचा खेळ
सुरू होतो श्रावणात
लपंडावाच हा खेळ खेळूनी
होते श्रावणाची सुरुवात
प्राजक्ताचा सडा
पसरतो मातीवर
ओंजळीत येता आपुल्या
दरवळतो मृदू सुगंध
हिरव्यागार तृणांवर
बरसुनी पावसाचे थेंब
हळुवार स्पर्शूनी पायांना
प्रफुल्लीत करतात मन
सरोवरात कमळे उमलतात अनेक
स्वर्गाचा अनुभव देतात सृष्टीवर
पाखरांची किलबिल
जणू गाण्यांची मैफिल
मोहून टाकतात स्वर
अल्हाददायक हवेत
By Archika Bapat
Comments