By Archika Bapat
मंदिराच्या गाभाऱ्यात असतो देवाचा वास
जीव माझा गुंतला उरला फक्त संवाद
अंतकरणाने भक्ती भावाने साद तुजला घातली
तुझ्याच चरणी राहण्याची इच्छा मनी जाहली
तुझ्या चरणी माझे मस्तक मी टेकले
तुझे चरण स्पर्श होता माझे मी न उरले
मनाने केला होता तुझ्याशी मूक संवाद
ओघळलेल्या आसवांना मिळेल स्थान तुझ्या चरणात
हर्षुन जाता मन एकरूप झाले तुझ्यात
घट्ट मिठीत तुझ्या झाले विलीन अनंतात
By Archika Bapat
Comments