top of page

बंदिस्त खैसाची कहाणी

Noted Nest

Updated: Dec 12, 2024

By Pooja Agale



गोष्ट आहे साधारणता 1970 च्या दशकातली यमुना च लग्न होऊन दोन वर्षे झाली होती तिला आता एक महिन्याचं ताणबाळ होतं सव्वा महिना झाला ही नव्हता तरी तिचा नवरा म्हणजे रामभाऊ तिला माहेरी घ्यायला आला तिचं सासर हे नांदगाव होत मात्र लग्न झाल्यापासून ते दोघेही कांगारवाडीच्या खादाणीवर कामाला होते. खदान कांगारवाडी पासून दोन किलोमीटर अंतरावर होती जायला यायला ताण नको म्हणून खादणीच्या बाजूलाच एक लहान झोपडी करून ते  तिथं च राहत असे.  ती आपली रोज सकाळी उठायची लेकराचं तिचं आवरायची भाकरीचं गाठोड अन बाळ पाठीवर बांधून खादाणी वर जायला निघायची येताना दोघे नवरा बायको सोबतच घरी यायचे. उन्हाळ्याचे दिवस चालू होते एक दिवस नांदगाव वरून चिठ्ठी आली यमुना ने रामभाऊला विचारलं काय हाय चिट्ठीत खुशाल तर आहेत ना?  रामभाऊ म्हणाला म्हातारी मरणाला टेकलीय मला घरी जायला लागणार. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वा. च्या गाडीने रामभाऊ नांदगाव ला रवाना झाला. आता घरी यमुना आणि तीच एक महिन्याचं बाळ दोघ च होते. आसपास  २ किलोमीटर पर्यंत एकही गाव नव्हतं. तिने रोजच्या प्रमाणे काम आवरली घरी न बसता ती नवरा नसताना ही कामावर गेली. दिवस संपला साही सांजा झाल्या, ती रोजच्या प्रमाणे घरी निघाली पण आज ती आणि तीच बाळ दोघ च होते. घरी येई पर्यंत काळोख झाला होता, तिने झोपडीची ताटी उघडली आणि आत पाऊल ठेवलं, बाळाला सतरंजी वर टाकून दिवा लावला. दिवा पेटून झाला, ती बाळाला मांडीवर घेऊन अंगाई म्हणत झोपी घालत होती.  

       तितक्यात दिवा विझला, बाळ ही झोपलं च होत तिने बाळा ला खाली सतरंजी वर टाकलं आणि उठून पुन्हा दिवा पेटवला. ती पुढे दोन पाऊल चालत च होती तितक्यात परत अंधार झाला, तिला वाटलं तिच्या चालण्याच्या क्रियेतून च दिवा विझला असावा, तिने मागे वळून पुन्हा दिवा लावला. मात्र या वेळेस दिवा लावता क्षणी च विझला.   आता तिच्या मनात शंका निर्माण झाली, बाहेर बघितलं तर झाडाचे पान हलावे इतके ही वार नव्हतं. तीने बाळाकडे नजर टाकली आणि पुन्हा दिवा पेटवला  ती दिव्याकडे लक्ष च ठेऊन होती. तर कुणीतरी फुंकर मारून विझवावा असा तो दिवा भिजत होता तिने कशीबशी हिंमत दाखवत पुन्हा दिवा पेटवला समोरून फुंकार मारल्याचा आवाज आला आणि दिवा भिजला ती पेटवायची तो भिजवायचा ती पेटवायची तो भिजवायचा आता ती खूप घाबरून गेली अंगाचा थरकाप सुटला, घामा गरज झाली तिच्याकडे फक्त तीनच आखाड्या उरल्या होत्या बाळाचा विचार करून तिने शेवटचा एक प्रयत्न करायचं ठरवलं तिने आकडे ओढली आणि समोरून फुक मारल्याचा आवाज आला ती आखाडीही भिजली आता मात्र तिच्या पायाखालची जमीन निसटली तिने पटकन घाईघाईने बाळाला कुशीत घेतलं तेवढ्यात एकदम भयानक आणि किसाळ वाणा आवाज आला “थांब!” 

        थांब असा आवाज येतच यमुना ला काय करावे कळेना ती खूप जास्त भयभीत झाली तिला फक्त तिथून निघायचं पडलेलं होतं ती घाबरत घाबरत पुढे पळू लागली. मागून अत्यंत भयंकर सुरात राक्षसासारखा आवाज आला की  “थांब तो बालक घेऊन या गावाच्या शिवारा बाहेर तू नाही जाऊ शकणार”  हे यमुनाने ऐकलं मात्र तिला फक्त तिथून पळ काढायचा होता ती गावच्या दिशेने पडू लागली.  वाऱ्याच्या गतीने ती धावत गावच्या जवळ आली गावात जाताना लागलेल्या पहिल्या घराजवळ ती थांबली, तिला बोलता येईना थरकाप होत होता घरातल्या बाईने तिला पाणी दिलं प्यायला आणि शांत बसवलं जेव्हा ती थोडं भानावर आली तेव्हा सगळा हा प्रकार तिने सगळ्यांना सांगितला.  आणि सगळ्यांना आश्चर्यच वाटलं की कुणी नसताना कसं काय आवाज आला आणि हा एवढा सगळा प्रकार घडला काय झालं तिथे या उत्सुकतेने भरपूर आजूबाजूचे लोक जमा झाले त्यातला एक वयोवृद्ध म्हातारा भानू बाबा पुढे आला आणि बोलला की “पोरी अजून काय बोलला तो तुला.”  तेव्हा यमुना म्हणाली मला काही कळालच नाही मला फक्त तिथून निघायचं होतं पण हा मी पळत असताना अजून एक गोष्ट ऐकली भानू बाबा ने एक क्षण न गमवता विचारलं -  काय?  यमुना बोलली  “मला शिवारा च्या बाहेर नाही जाऊ देणार आणि माझ्या बाळाला पण”  भानू बाबाने भयभीत होऊन विचारलं -  बाळ कुठे आहे तुझं? बाळ किती मोठा आहे?  यमुनाने बाजूला झोपलेले बाळ भानू बाबाला दाखवलं आणि बोली एक महिन्याचा आहे.  भानु बाबा डोक्याला हात लावून खाली बसला आणि सांगू लागला की तो नाही जाऊ देणार.  बाजूला उभा असलेल्या लोकांनी संशय आणि विचारले तो कोण?  मग भानू बाबांनी सांगायला सुरुवात केली माझा चुलता मला सांगायचा की आपल्या गावच्या ओढ्यात लिंबाखाली पांढऱ्या कपड्यात एक म्हातार बसायचं, ते फक्त अमावस्या पुनवेलाच दिसत असे.  पण जेव्हा ते अगंतुक दिसायचं तेव्हा गावातल्या बकऱ्यांची पिल्ले कोंबड्यांची पिल्ले गायब होऊन जायच्या.

 तसं जेव्हा होत राहिलं भरपूर वर्षे तर लोकांनी मग बकऱ्यादायी कोंबड्या पाळणा सोडलं मग मग भरपूर दिवस तो यायची गावात माहिती पसरली नाही.  

        एकदा पोळ्याच्या अमावस्येला खूप मोठ्या मोठ्याने भया व आवाज येऊ लागले.  गावकऱ्यांनी फेरी मारून बघितली कुणीच नव्हतं सगळे पोळा साजरा करून रात्री झोपी गेले.  पण त्या दिवशीपासून खरं थैमान सुरू झालं त्या दिवशी रात्री एका ओल्या बाळंतनीच पंधरा दिवसाचं बाळ गायब झालं,  प्रत्येक अमावस्येला कुणाचं ना कुणाचं तरी गायब होत गेलं गावकरी हैराण झाले.  गावातलं वातावरण एकदम भयंकर झालं तेव्हा गावातील लोकांनी विचार करून एका बंगाली वैद्याला बोलवलं.  आणि त्याने कुणालाच विश्वास बसणार नाही ते करून दाखवलं,  बंगाली वैद्य कालिका मातेचा भक्त होता त्यांनी पूजा मांडली ओढ्यामध्ये आणि मंत्र बोलत राहिला.  त्यांना काहीतरी आवाज आला वैद्याने मंत्र थांबवले..  समोरून एकदम भीतीदायक आणि जाड स्वरात आवाज आला “कोण आहे कोण माझ्या वाट्याला जातय?"  मी जितं खाऊन घेईल. " 

 तो वैद्य काहीच न बोलता पुन्हा मंत्र बोलू लागला आणि अजून जोरात बोलू लागला,  आता त्या मंत्रांचा त्रास होतोय असं त्या समोरच्याच्या आवाजात दिसलं जेव्हा तो बोलला “ रागात पिणारा खैस हाय मी, माझ्या वाट्याला जाल तर सार गाव बसून टाकीन एका घासात. "  हे ऐकताच गावकरी स्तब्ध झाले आणि त्यांना भीतीने घाम सुटला.  पण त्या बंगाली वैद्याने तंत्र मंत्राच्या जाळ्यात त्या खैसा ला अडकवलं आणि डोंगराच्या कडेच्या भल्या मोठ्या एका दगडाला त्याला बंदिस्त केलं.  एवढं सगळं ऐकून यमुना आणि तिथे जमा झालेले लोक आश्चर्यचकित झाले.  यमुना म्हणाली भानू बाबा पण त्याला तर बंदिस्त केलं होतं ना मग आता, त्यावर भानू बाबा बोलले होय बंदिस्तच हाय तो पण तुझ्या झोपडीच्या बाजूला जो मोठा दगड आहे त्यात.   तो त्याला जगू देणार नाही हे ऐकून यमुना घाबरली.  आणि म्हणाली नाही बाबा काही पण काय बोलताय,  आणि तुम्हीच तर बोलले तो बंदिस्त आहे.  भानू बाबा म्हणाले अग पोरी त्याची काळी नजर म्हणजे जणू शाप च तू हे लेकरू त्याला देऊन टाक,गाव सोडून निघून जा.  यमुना ला ही गोष्ट काही पटली नाही दोन दिवस ती गावातच राहिली तिसऱ्या दिवशी रामभाऊ नांदगाव वरून परत आला.  उतरून चालतच होता तर समोरच्या घरात यमुना दिसली त्याने विचारलं तू इथं कशी?  यमुनाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला.  

          रामभाऊ ने झोपडीकडे ही न जाता असंच तिथून नांदगाव म्हणजे त्यांच्या मूळ गावी जायचं ठरवलं.  ते दोघे तिथून निघाले बाळाला घेऊन दुपारच्या गाडीने जायचं निर्णय घेतला,  दुपारची गाडी दोन वाजता आली बाळाला घेऊन गाडीत बसले बस स्थानकाजवळ भरपूर लोक आलेली होती त्यात भानुबाबाही होते, यमुना ने त्यांच्याकडे बघितलं अन गाडीत बसली.  कंडक्टर घंटी वाजवली आणि गाडी चालू झाली.  तिच्या मनात अजून भीती आणि धाक होताच गाडी आता बरीच पुढे आली, सोडलं आणि तिने मोकळा श्वास घेतला.  चार दिवसापासून व्यवस्थित झोप नाही आणि थकलेली होती म्हणून बाळाला रामभाऊ कडे देऊन तिने तिथे बसल्या जागी थोडा डोळा लावला.  रामभाऊ बाळाला हलक्या हाताने खेळवत होता तेवढ्यात ड्रायव्हरने खूप जोरात ब्रेक लावला...  एवढा जोरात की मागे बसलेले तर उचलून फेकल्यासारखे झाले काहींचे तर डोकं ही फुटले, यमुनाचं डोकंही पुढच्या सीटवर जाऊन धडकलं रामभाऊ कडेने होता  स्वतःला सांभाळत त्या दोघांना बघितलं रामभाऊ खाली पडलेला होत आणि त्याच्या बाजूला तिचं बाळ रक्ताने लतपत होऊन पडलेलं होतं ती जोरात ओरडली...  रामभाऊच्याही हाताला आणि डोक्याला मार लागलेला होता ती शिव्या देऊ लागली त्या खैसा ला.  आता ती भानावर नव्हती रामभाऊने त्याला उचललं आणि दवाखान्यात घेऊन जायला निघाला,  दवाखाना शहराच्या ठिकाणी होता दोन पाऊल चालला आणि त्याच्याही डोळ्यातून पाणी आले...  ते दृश्य अगदी चित्तथारारक होतं इकडे यमुना भानावर नव्हती, रामभाऊ ला कळुन चुकलं होतं की हे चिमुकलं बाळ जग बघायचे पहिले सोडून गेले...  बसचा अपघात झाला ही बातमी गावकऱ्यांना कळाली गावातून भरपूर लोक तिथे जमा झाले, शेवटी भानू बाबाच्या म्हणण्यानुसार त्या चिमुकल्या बाळाला तिथेच खड्डा खोदून पुण्यात आलं.  खरंतर त्याला हा सगळा प्रकार तो त्याच्यासोबत झाला चा अंदाजही नव्हता आणि ज्ञानही नव्हतं.  रामभाऊ स्वतःला दोषी मानू लागला की जर तो सोडून गेला नसता तर हे झालं नसतं.  गावकऱ्यांनी त्याची समजूत घातली आणि ते सगळं सोडून त्यांच्या मूळ गावी नांदगावला निघून जायचा सल्ला दिला.  आणि त्यांनी हे म्हणणं ऐकून त्यांच्या गावी निघून गेले.  अर्थातच हे सगळं विसरणं सोपं नव्हतं यमुनासाठी पण दुःख मनातच ठेवून ते दोघेही संसाराचा गाडा पुढे घेऊन चालले होते.

          पुढील आयुष्यात तिला पाच लेकरं झाली तीन मुली आणि दोन मुलं पण दुर्दैवाने एकही जगू शकलं नाही लेकरं जन्माला येताच मृत असायची देवधर्म सगळं केलं तरी हेच चालू राहिलं.   आणि यमुना चा मृत्यू एक वांझबाई म्हणूनच झाला.....

                                                     

By Pooja Agale



2 views0 comments

Recent Posts

See All

দিনলিপি

By Tanushree Ghosh Adhikary 'দিব্যি আছি', সুনীল গঙ্গোপাধ্যায়ের কবিতার মতো।  তুমিও তোমার মতো দিব্যি আছো। মনে পড়ার গল্পে আজ আর যাব না। ভুলত...

Waiting For Someone?

By Kasturi Bhattacharya ‘I keep insisting you on doing things that you do not like, I get it, but we don’t have any other options.’ ‘I...

The Hostel Menace

By Jameel Shahid Raza Hello people, I am Jameel, 18 years old, I am currently pursuing engineering. I live in hostel which is free for...

Commentaires


bottom of page