By Tejaswini(Tejoy)
गरीबाच पोरग म्हणे चंद्रावर गेलं
Middle class बाबू आमचा TV च्या बटणा दाबून रायल
आता सांगतो गम्मत राजे हो हे कसं झालं
बाप याचा म्हणे लेका अभ्यास कर
आल्या गेल्या ले काय सांगिन याची सोय कर
वर्गात येशिन तु लेका पहिला त गावात राहीन माया दनाना
गरीब बाप तुरी सौंगले जाते पोरग वाचते यातच खुश होते
माया पोरगा वाचून रायला माया संग कवाकवा धुर्यान निंदून रायला
परीक्षेत बाबु इचारच करत रायला
न गरिबाच्या पोरानं पैला नंबर काढला
दोन मार्काच्या फरकान पोरग मांग रायल
याच्या बापानं मंग पट्ट्यान झोडला
मने अभ्यासाचा याले येते लय कटाळा
पुस्तक घेऊन बाबु पायते TV जरा जरा
असाच बाबु कॉलेजात गेला
बापाच्या अपेक्षा लय लय वाढल्या
पोरग मनते बाबा मी हेच शिकिन
बापाच्या पुढं याची कुठं वाजते बिन
शेतकरी बाप आपला गर्वान सांगे
माय पोरगं कॉलेजात शिकाले जाते
काय शिकते मले माईत नाई
माया सारखा डोबत त नाई
आमचा बाबु ऑफिसात साईब झाला
न गरिबाच पोरग scientist झाला
मनुन सांगतो राजे हो ……
गरीबाच पोरग चंद्रावर गेलं
न हे TV च्या बटणा दाबुन रायल
By Tejaswini(Tejoy)
Comments