By Manisha Nandgaokar
आपल्या मधलं हे अंतर कमी करायचं आहे
एकमेकांची वाट बघणं संपवायचं आहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
आयुष्याचा नवा प्रवास एकत्र सुरू करायचा आहे
हातात हात धरून तुझ्यासोबत चालायचे आहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
दोन ह्रदये एकसारखी धडधडू द्यायची आहेत
जे जे डोळ्यांनी स्वप्न पाहिले ते प्रत्यक्ष घडवायचं आहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
तुझ्या प्रत्येक विचारात आणि प्रार्थनेत राहायचं आहे
तुझ्या बाजूला बसून तुझ्यासाठी प्रार्थना करायची आहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
तुला माझ्याकडे टक लावून बघताना पकडायचे आहे
तुझ्या डोळ्यांत माझे प्रतिबिंब पहायचे आहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
अनकही रहस्ये लपवणाऱ्या तुझ्या डोळ्यांना वाचायचं आहे
तुझ्या प्रेमाची कुजबुज ऐकायची आहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
तुझ्यात स्वतःला पूर्ण शोधायचे आहे
माझा आत्मा तुझ्याशी जोडायचा आहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
तुझ्या सहवासात सर्व चिंता सोडून द्यायच्या आहेत
तुझ्या हळुवार स्पर्शाने माझे डोळे मिटायचे आहेत
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
पहिल्या पावसात एकत्र भिजायचे आहे
आयुष्याचा प्रत्येक ऋतू तुझ्यासोबत जगायचा आहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
उज्वल दिवसात तुझ्या मिठीत राहायचे आहे
गडद रात्री तुझा स्पर्श अनुभवायचा आहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
शुद्ध आणि खरे प्रेम तुझे हवे आहे
तुझ्याशी कायमचे जखडून जायचे आहे
आपण कधी भेटतोय एकदाचं असं झालंय
By Manisha Nandgaokar
Ati sundar...
This poem moved me deeply. The raw emotion you expressed is palpable and relatable.
खूप सुंदर 👌👌
Nice 👍